सडक सुरक्षा रेलीस नागरिकांचा प्रतिसाद
जुन्नर : स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्कृती मंत्राछय भारत सरकार आणि ब्रह्माकुमारी यांच्यावतीने जुन्नर ते भोसरी सडक सुरक्षा मोटार सायकल रॉलीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिव्ठाला. त्याचा शुभारंभ ब्रह्मकुमारीज सेवा केंद्र जुन्नर येथे दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेव्टी दुर्गगाज खोत याने शिवगर्जना म्हटली. कल्पेश परदेशी याने तलवारबाजीची प्रात्यक्षिके करून दाखवली.
दुर्गसंवर्धक विनायक खोत यांना ‘शिवनेरी भूषण’ पुरस्कार मिव्ठाल्याबददल जगदंबा भवनच्या संचालिका सुनंदा दीदी यांनी सन्मानित केले. या वेव्टी त्या म्हणाल्या, “वाहन चालवताना जबाबदारी, स्वयंशिस्त, संयम, जागृती या गुणांची आवश्यकता आहे. राजयोगाच्या अनुभूतीद्वारे आपण या गुणांची धारणा करू शकतो. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवताना मनाच्या वेगावर नियंत्रण असणे गरजेचे आहे.”‘ याप्रसंगी जुन्नर नगर पालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी रँलीला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन बी. के. सुलभा दीदी यांनी केले. संयोजन जुन्नर सेवा केंद्राच्या संचालिका बी. के. वंदना,
मनीषा, रामेश्वर, रोशनी यांनी केले.